Pimpri : मैत्रीला मिळणार भावनांचे कोंदण

फ्रेंडशिप डे निमित्त भेटवस्तूंनी शहरातील बाजारपेठ फूल

एमपीसी  न्यूज – ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार या दिवसाला ओळख देणारा फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी बाजारपेठेत भेटवस्तूंच्या वैविध्याची मालिका दाखल झाली आहे. या निमित्ताने मैत्रीला भावनांचे कोंदण मिळणार आहे. मैत्री व्यक्त करण्यासाठी तरुणाईच्या जगात उत्साहाला पालवी फुटली आहे. दरम्यान, ग्रीटिंग कार्डपासून ते कीचेन्स अशा ऑलटाइम फेव्हरेट गिफ्ट शॉपीपर्यंत ते स्मार्ट फोनच्या अॅक्सेसरीजपासून ते ब्रँडेड फॅशन ट्रेंडपर्यंतची बाजारपेठ तरुणाईच्या गर्दीने फुलून गेली आहे. 

उद्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा होणार आहे. या दिवसासाठी तरुणाई तयारीला लागली आहे. त्यामुळे बाजारपेठेतही फ्रेंडशिप डे ची चाहूल लागली आहे. फ्रेंडशिप बँड, ब्रेसलेट यामध्ये नाविन्यपूर्ण डिझाइन भेटवस्तूंच्या दुकानात लक्ष वेधून घेत आहेत. स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात असल्यामुळे स्मार्टफोनच्या कव्हर, बॅक पॉकेट अशा प्रत्येक प्रकारच्या अॅक्सेसरीजनी तरुणाईला भूरळ घातली आहे.

मित्र-मैत्रीणींचा फोटो असलेले कॉफी मग, कुशन्स, लॉकेट, फोटो फ्रेम, वॉलपीस अशा खास भेटवस्तू तयार करून घेण्यासाठी तरुणाई आर्टिस्टच्या भेटी घेत आहे. अगदी ५० रूपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू फ्रेंडशीप डे साठी बाजारात आल्या आहेत. कॉलेज आणि मैत्री यांचे नाते नाजूक असल्यामुळे फ्रेंडशिप डे खास पद्धतीने साजरा करण्याच्या हटके कल्पनांनाही उधाण आले आहे. तरुणाईचा उत्साह पाहून शहरातील गिफ्टशॉपीही सजल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

स्लॅम बुक, पॉकेट ग्रीटिंग, ओपनिंग रोझ, नावाच्या आद्याक्षरांच्या बीडसचे किचेन्स आणि लॉकेट, कॉफी मग यांना यावर्षी फ्रेंडशिप डे साठी खास पसंती आहे. तर मुलांकडून मुलींना देण्यासाठी परफ्यूम, ब्रेसलेट, इअररिंग्ज, हेअर अॅक्सेसरीज, क्लचर, पर्स, डिझायनर घड्याळ, टॉप्स, कॉस्मेटिक कीट या गिफ्टसची चलती आहे. मुली मुलांना भेटवस्तू देण्यासाठी वॉलेट, मोबाइल कव्हर्स, ब्रेसलेट, घड्याळ, फोटो फ्रेम, कानबाली, शर्ट, टी शर्ट, याची निवड करत आहेत. याशिवाय सरप्राइज पार्टी, केक यांचीही जोड मिळणार आहे.

ग्रिटींगजला व्हॉटसअ‍ॅपचे ग्रहण

ग्रिटींग हा प्रकार पूर्वी जोमात चालत होता. प्रत्येक सण किंवा विशिष्ट दिवसांसाठी ग्रिटींग कार्ड उपलब्ध आहेत. एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी हमखास ग्रिटींग खरेदी केले जात होते. मात्र मोबाईल आल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींगची पद्धत आता बंद पडली आहे. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल असून त्यात व्हॉट्सअ‍ॅपने चांगलाच गोंधळ घातला आहे. सगळेच शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅपवरूनच समोरच्या व्यक्तीला पाठवून सगळे मोकळे होत आहेत. यातून ग्रिटींगसाठी येणारा खर्च वाचत असल्याने ग्रीटिंग देण्याची पद्धतच संपुष्टात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.