India Corona Update : आनंद वार्ता ! रिकव्हरी रेट 98 टक्के, 24 तासांत वीस हजाराहून कमी रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असून, मागील चार ते पाच दिवसांपासून वीस हजाराहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली होत आहे. तसेच, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. लसीकरण देखील वेगाने सुरू असून, देशाने लसीकरणाचा 95 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 18 हजार 132 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 39 लाख 71 हजार 607 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 32 लाख 93 हजार 478 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 21 हजार 563 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 2 लाख 27 हजार 347 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशात 193 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 50 हजार 782 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 58 कोटी 36 लाख 31 हजार 490 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 10 लाख 35 हजार 797 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 95 कोटी 19 लाख 84 हजार 373 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 46.57 लाख जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.