Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येक भारतीयाने सामील व्हावे – किशोर आवारे

एमपीसी न्यूज : हर घर तिरंगा मोहीम (Har Ghar Tiranga) भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ नागरिकांना त्यांचा राष्ट्रध्वज घरी घेऊन जाऊन प्रदर्शित करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.Har Ghar Tiranaga भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचे उद्दिष्ट ध्वजाशी वैयक्तिक बंध निर्माण करणे आणि ते देशात एकत्र येणे हे आहे. हर घर तिरंगा अभियान देशभक्तीची भावना वाढवेल आणि ध्वजाबद्दल जनजागृती करेल असा विश्वास जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येक भारतीयाने सामील व्हावे असे आवाहन आवारे यांनी केले आहे. जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून हर घर तिरंगा या मोहिमेला क्रांती दिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब जांभुळकर, तसेच ज्येष्ठ नेते सुरेशभाई शहा, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, तसेच तळेगाव शहरातील ज्येष्ठ निवेदिका विनायताई केसकर यांना सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

एकूणच पाच हजार तिरंगा वितरणाचे जनसेवा विकास समितीचे उद्दिष्ट असून हर घर तिरंगा मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक भारतीयाला त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे हा आहे. राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक नाते प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा (Har Ghar Tiranga) उद्देश आहे. त्यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिथे भारतीयांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी दिली जाईल असे आवारे यांनी नमूद केले.

राष्ट्रध्वजाची भारतातील नागरिकांचे नाते दृढ व्हावे, यासाठी जनसेवा विकास समितीने सुरू केलेला प्रकल्प अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ. आनंत परांजपे यांनी यावेळी केले. याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक सुनील कारंडे, समीर खांडगे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, समीर दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Today’s Horoscope 10 August 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.