गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Har Ghar Tiranga : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची जनजागृती

एमपीसी न्यूज – भारत देशाला स्वातंत्र्य मिऴून 75 वर्ष झाली. याच महूर्तावर देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारमार्फत संपूर्ण देशात हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबवला जाणार आहे. याच उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने विविध उपक्रमाद्वारे मंगळवारी (दि.9) जनजागृती करण्यात आली.

यामध्ये निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील 400 विद्यार्थी तसेच निगडी, पिंपरी, तळेगाव दाभाडे, वाकड या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या पोलीस बँड पथकाने सहभाग नोंदवला होता.

या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा पथनाट्य, स्वातंत्र्यलढा या विषयावर पथनाट्य सादर करत नागरिकांना उपक्रमाची माहिती दिली. तर, वाकड येथील डांगे चौक, निगडीतूल भक्ती शक्ती चौक, पिंपरीतील आंबेडकर चौक, तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या बँड पथकाने देशभक्तीपर गीत वाजवून नागरिकांना उपक्रमाची माहिती दिली.

हर घर तिरंगा उपक्रमात नागरिकांना त्यांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खासगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणीक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज स्वइच्छेने (Har Ghar Tiranga) उभारता येणार आहे. नागरिकांनी यात जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

spot_img
Latest news
Related news