Dr. Sanjay shinde: केवळ घरात नाही तर प्रत्येकाच्या मनात तिरंगा स्थापित झाला पाहिजे – डॉ.‌ संजय शिंदे

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगाहा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे. शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग बघून त्यांना खूप आनंद होतो.(Dr.Sanjay shinde) या निमित्ताने तिरंगा प्रत्येक घरावर लावलाच पाहिजे. परंतु सोबत तो आपल्या प्रत्येकाच्या मना मनामध्ये देखील तो स्थापित झाला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ.‌ संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शनिवारी (दि.13) सकाळी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत  ‘हर घर तिरंगा रॅली’ काढण्यात आली.या प्रसंगी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मानसी हसबनीस, तांत्रिक विभाग प्रमुख  समीर जेऊरकर, तसेच  रॅलीमध्ये नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आदी सहभागी होते. या मार्गातील पालक, तसेच नागरिकांनी तिरंगा रॅलीचे स्वागत केले.

Pune Police: पुणे पोलिसांच्या दौड स्पर्धेत वैष्णवी जाधव व रोहीत जाधव यांनी पटकवाला प्रथम क्रमांक

अमित गोरखे यांनी मार्गदर्शन करताना सर्व विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि उपस्थितांचा उत्साह हर घर तिरंगा मोहिमेचा जल्लोष वाढविणारा व द्विगुणीत करणारा आहे.‌(Dr.Sanjay shinde) दरवेळी वेगवेगळे उपक्रम राबवून नोव्हेल विद्यालय विद्यार्थ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करत असते, अशा‌ शब्दांत कौतुक केले.‌ कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाळेतील शिक्षिका संजना गायकवाड यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.