Wakad : दुस-या मुलीसोबत लग्न करण्याची धमकी देत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – डायनिंग टेबल, एसी इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन, टीव्ही, इनोव्हा कार  माहेरहून आण. जर माहेरच्या लोकांनी या वस्तू दिल्या नाहीत तर पतीचा दुस-या मुलीसोबत विवाह लाऊन देऊ म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती संदीप शिवाजीराव सारोळकर, सासू मीना शिवाजीराव सारोळकर, सासरे शिवाजीराव सारोळकर, दीर शिरीष शिवाजीराव सारोळकर, नणंद स्वाती संजय गाडे, नंदावा संजय गाडे (सर्व रा. प्रिस्टीन प्रो लाईफ, फेज नंबर एक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 24) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जून 2019 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी विवाहितेला लग्नात काहीही दिले नाही. असे म्हणून इनोव्हा कारची मागणी केली. कार न दिल्याने विवाहितेला आरोपींनी टोमणे देऊन छळ केला. तसेच डायनिंग टेबल, एसी इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन, टीव्ही, इनोव्हा कार दिले नाही तर आम्ही पती संदीप याचे दुस-या मुलीसोबत लग्न करून देऊ अशी धमकी दिली.

विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन त्यामध्ये सोन्याची बॉक्स साखळी, तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, एक तोळ्याचे सोन्याचे झुमके, दोन तोळ्याची रुद्राक्ष माळ, दीड तोळ्याची साखळीची चेन, एक अंगठी काढून घेऊन विवाहितेला बेदम केली. याबाबत कुठेही वाच्यता केली तर याच फ्लॅटवर जिवंत मारून टाकू अशी धमकी देत छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III