Pune News : टीमलीडरकडून सहकारी तरुणीचा विनयभंग

पुण्याच्या नामांकित कंपनीतील घटना

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील येरवडा परिसरात असणाऱ्या एका नामांकित कंपनीतील टीमलीडरनेच सहकारी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातत्याने छळ होत असल्याने या तरुणीने आपल्या वरिष्ठांकडे या संपुर्ण प्रकाराची तक्रार केली होती. परंतु वरिष्ठांनी यावर कुठलीही कारवाई न केल्याने या तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. 

_MPC_DIR_MPU_II

येरवडा पोलिसांनी या प्रकरणी, टीमलीडर संजय दास आणि कंपनीतील इतर काही अधिकाऱ्यांवर विनयभंग यासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. एका 22 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात ही नामांकित कंपनी आहे. मागील काही दिवसांपासून पीडित तरुणी या कंपनीत काम करत होती. या तरुणीचा टीम लीडर असलेला संजय दास तिला सातत्याने त्रास द्यायचा. अश्लील कमेंट करणे, अंगाला स्पर्श करणे, घाणेरड्या नजरेने पाहणे असे प्रकार तो वारंवार करत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून तिने आपल्या वरिष्ठांकडे त्याची तक्रारही केली होती परंतु त्यांनी दखल न घेतल्यामुळे शेवटी तिने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.