BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : लग्नात मानपान न केल्यावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही, तसेच लग्नात मानपान केला नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना 25 ऑक्टोबर 2015 ते 18 सप्टेंबर 2019 या कालावधीत चिखली येथे घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय विवाहितीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती दिनेश हरीभाऊ उमरे, सासु भिलाबाई हरीभाऊ उमरे (रा. बेजगाव, नाशिक), अमित उमरे, मंगळ बोडके, संगिता घुगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर 2015 ते 18 सप्टेंबर 2019 या कालावधीत फिर्यादी महिलेच्या माहेरच्या लोकांनी लग्नामध्ये ठरल्याप्रमाणे मानपान दिला नाही. यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वारंवार अपमान केला. ‘तुला स्वयंपाक व्यवस्थित करता येत नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली बाई भेटली आहे, तुझी गरज नाही’ असे म्हणत आरोपी पतीने विवाहितेला वारंवार मारहाण केली. घरामध्ये रेशन न भरता त्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3