Somatane Fata Crime News: ‘तुझ्या घरुन काही आणले नाही’ म्हणत विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तुझ्या घरुन काही आणले नाहीस असे म्हणत देण्याघेण्यावरुन विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 मार्च 2021 ते 22 मे 2022 दरम्यान सोमाटणे फाटा येथील शिंदेवस्ती येथे घडला.

याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजय अशोक गायकवाड (वय 31), अशोक गणपत गायकवाड (वय 55), मीना अशोक गायकवाड (वय 50) आणि सुशांत अशोक गायकवाड (वय 29, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे) यांच्याविरोधात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचे लग्न झाल्यापासून सतत तुझ्या घरुन काही आणले नाही तसेच देण्याघेण्यावरुन फिर्यादीचे सासरे, सासु, दीर, नवरा टोमणे मारत. शिवीगाळ करत घरच्या छोट्या कारणांवरुन मारहाण करीत. फिर्यादीने वारंवार नांदायला जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, फिर्यादीच्या सासरच्या लोकांनी घरामध्ये घेतले नाही. नेहमी तुझ्या या घराशी काही एक संबंध नाही. तुला आम्हाला नांदवायचे नाही. तु येथे थांबु नको असे म्हणत अपमान केला. वारंवार शिवीगाळ करुन शारिरीक, मानसिक छळ केला असे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगावदाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.