Pune News : ‘रंगाने काळी आहेस’ म्हणत विवाहितेचा छळ

पती, सासू सासरे आणि ननंद विरुद्ध गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज : “तू रंगाने काळी आहेस, तुझ्यामुळे आमचे वाटोळे झाले आहे” असे म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासू-सासरे आणि नणंद विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 39 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

पती अशोक सूर्यकांत बाठे (वय 44) यांच्यासह सासू-सासरे आणि ननंद विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की लग्न झाल्यापासून आरोपींनी फिर्यादी महिलेला, तु रंगाने काळी आहेस, तुझ्यामुळे आमचे वाटोळे झाले आहे, तुझ्या अंगाला उंदीर मेल्याचा वास येतो, तू रोगट आहेस, असे म्हणून वेळोवेळी अपमान करून फिर्यादीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे.

याशिवाय लहान सहान कारणावरून फिर्यादीला आरोपी अशोक बाठे याने मारहाणही केली आहे. तसेच फिर्यादी महिलेला धमकावून आरोपीने व्यवसायासाठी माहेरहून दीड लाख रुपये रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम स्वीकारल्यानंतरही वेळोवेळी फिर्यादीचा छळ केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment