Dighi Crime News: व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेकडे तगादा लावला. स्वयंपाक येत नसल्याचे म्हणत टोमणे मारुन विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 14 ऑगस्ट 2021 ते 25 एप्रिल 2022 दरम्यान दिघी येथे घडला.

याप्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पती भागवत श्रीरंग खरात (वय 23), सासरे श्रीरंग खरात, दीर केशव श्रीरंग खरात, दीर कृष्णा श्रीरंग खरात, जाऊ (सर्व रा. सोनपेठ, परभणी), नणंद, नणंदेचा पती अभिमान अर्जुन शिंदे (दोघे, रा. दिघी) आणि बीड येथील माजलगाव येथील नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या पतीने व्यावसायाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. स्वयंपाक करता येत नाही. घरातील कोणतेही काम नीट करता येत नाही. या कारणावरुन टोमणे मारले, वाद केला. फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. मानसिक व शारिरीक छळ केला. फिर्यादीच्या वडिलांना बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.