Wakad: लग्नात सोन्याची चेन न दिल्याने विवाहितेचा छळ

harassment of a married woman for not giving a gold chain at a wedding in Wakad विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली.

एमपीसी न्यूज- लग्नात सोन्याची चेन दिली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला, अशी फिर्याद संबंधित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. हा प्रकार 21 नोव्हेंबर 2018 ते जून 2019 या कालावधीत अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे घडली.

आशिष सतीश आढाव (वय 30), रिबेका सतीश आढाव (वय 48, दोघे रा. अजमेरा कॉलनी, पिंपरी), स्वप्नाली सतीश आढाव (वय 28, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 23 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या लग्नात त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फिर्यादी यांच्या सासरच्या लोकांना सोन्याची साखळी दिली नाही.

या कारणावरून तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like