Sangvi : लग्नात चांगल्या वस्तू न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

0

एमपीसी न्यूज – लग्नात चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. तसेच लग्न व्यवस्थित लावून दिले नाही, यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 19 जानेवारी पासून 18 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सांगवी परिसरात घडली.

 

गुरबीर सिंग सेठी, तरविंदर कौर सेठी, जसबीरसिंग सेठी, अजितसिंग सेठी (सर्व रा. जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 27 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या वडिलांनी विवाहितेचा विवाह व्यवस्थित लावून दिला नाही. लग्नामध्ये चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. लग्नातले जेवण गुरुद्वारामध्ये दिले असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III