BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – वारंवार पैशाची मागणी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ही घटना 4 जुलै 2008 ते 30 मे 2019 या कालावधीत महेशनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती रोहन पंकज पटेल (वय 36), सासू मीना पंकज पटेल (दोघे रा. महेशनगर पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेकडे पती रोहन आणि सासू मीना या दोघांनी वारंवार पैशाची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3