_MPC_DIR_MPU_III

Kasarwadi Crime News : शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. कासारवाडीतील शितांगण गार्डन शेजारी शनिवारी (दि. 06) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

_MPC_DIR_MPU_IV

याप्रकरणी पीडित महिलेनं शनिवारी (दि. 06) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी मंगेश अंकुश लांडे (रा. कासारवाडी) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या शेतात बांबू लावण्यास विरोध केला. तसेच, ‘मी तुझ्या दिराला जसे संपवले तसे तुझ्या नव-याला देखील संपवतो’ अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादी महिलेला वाईट शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक साबळे करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.