Hinjawadi : हुंडा कमी दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार एप्रिल 2015 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान म्हाळुंगे आणि महिलेच्या सासरी बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश येथे घडला.

याप्रकरणी 29 वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती तुषार मधुकर पाटील (वय 32, रा. म्हाळुंगे), सासू सुरेख मधुकर पाटील (वय 50), सासरा मधुकर पाटील (वय 57, दोघे रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश),पतीचा मामा ईश्वर भगवान पाटील (वय 54, रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेस मारहाण करून शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक त्रास दिला. तर अन्य आरोपींनी आपसात संगनमत लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला. आरोपींनी पतीच्या आजाराची माहिती लपवून ठेवली. याबाबत विवाहितेने विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची व घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.