Pimpri : विवाहितेच्या हनिमूनचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत छळ; सासरच्या सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या हनिमूनचे आणि त्यांच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच 19 लाख रुपये, 80 तोळे सोन्याचे दागिने आणि कंपनीत गुंतवलेले शेअर्स घेऊन विवाहितेची फसवणूक करत छळ केल्याची फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती रमीज कुणी मोनू (वय 33), सासू झुबेदा कुणी मोनू (वय 56), नणंद रुतबा अब्दुल हसन टोनसे हवालदार (वय 34), अब्दुल हसन टोनसे हवालदार (वय 39), मावस नणंद सफिया अली (वय 45, सर्व रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तसेना रमीज मोनू (वय 29, रा. कामगारनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने घेतला. मोबाईलमधील माहितीच्या व आरोपींकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी आणि त्यांच्या मुलीच्या खात्यावरून 19 लाख रुपये ट्रान्स्फर करून घेतले. फिर्यादी यांच्या नावावर एका कंपनीत शेअर्स होते. ते देखील आरोपींनी ट्रान्स्फर करून घेतले.

फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी लग्नात स्त्रीधन म्हणून दिलेले 80 तोळे सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने घेऊन ते त्यांना परत न देता फसवणूक केली. तसेच पती व सासूने वेगवेगळ्या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या हनिमूनचे आणि त्यांच्या बहिणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.