BNR-HDR-TOP-Mobile

Rathani : विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज –  किरकोळ कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रहाटणी येथे घडली. 

पती शंतनू शिवप्रसाद घोष (वय 42, रा. शिवार चौकाजवळ, रहाटणी), सासू अंजली शिवप्रसाद घोष, सासरे शिवप्रसाद घोष व दीर अतनू शिवप्रसाद घोष (सर्व राहणार पश्‍चिम बंगाल) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी शंतनू घोष आणि फिर्यादी महिलेचा सन 2006 मध्ये विवाह झाला. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने याबाबत अधिक तपास करीत आहेत.

.