Harbhajan Opt out of IPL: सुरेश रैनाच्या पाठोपाठ हरभजन सिंगनेही घेतली IPL मधून माघार

एमपीसी न्यूज – सुरेश रैना पाठोपाठ फिरकीपटू हरभजन सिंगने आयपीएल मधून माघार घेतली आहे. हरभजनच्या माघार घेतल्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला दुसरा झटका बसला आहे. हरभजन सिंग यांने वैयक्तिक कारण देत या स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजते आहे.

एनडीटीव्ही स्पोर्ट्स या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजन सिंग यांने वैयक्तिक कारण देत आयपीएलच्या तेराव्या हंगामातून माघार घेतली आहे. आज (शुक्रवारी) हरभजनने आपला निर्णय संघाला कळवला आहे. सुरेश रैनाने आयपीएल मधून माघार घेतल्यानंतर तो भारतात परतला होता त्यानंतर हरभजनने आयपीएलमधून माघार घेतली असून चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.
हरभजन सिंगच्या आयपीएल मधील सहभागाबाबत पहिल्यापासून शंका उपस्थित केली जात होती मात्र सुरेश रैना याने अचानक माघार घेतली आणि चेन्नई संघात कुजबुज सुरू झाली. हरभजन सिंगने तेराव्या हंगामातून माघार घेताना वैयक्तिक कारण दिले आहे पण आहे कारण नक्की काय आहे याबाबत अजून माहिती समोर आली नाही. आता चेन्नईच्या संघातून हरभजन सिंग ची जागा नक्की कोण घेणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.