Pune Crime News: शिवाजीनगर परिसरातील अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध 

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारावर चतुःशृंगी पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. शुभम राजेंद्र हिंगाडे (वय 26, रा. वैद्य बंगला, नमन सोसायटी, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर) असे या  गुन्हेगाराचे नाव आहे. 

 

शुभम हिंगाडे हा चतु:शृंगी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चतु:शृंगी स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने कोयता, चाकू, तलवार यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगून जबरी दुखापत, दुखापत, यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी एकदा त्याच्यावर  प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन सुद्धा त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर काहीएक परिणाम झाला नाही. त्याच्यापासून जीवालाा धोका निर्माण होईल म्हणून सर्वसामान्य नागरिक त्याच्या विरोधात उघडपणे तक्रार करण्याचे टाळत आहेेत.

 

त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा निर्णय चतुशृंगी पोलिसांनी घेतला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी स्थानबद्ध करून येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.