राष्ट्रीय ओविनाम चॅम्पियनशिप स्पर्धेत हर्षल गरड यांनी जिंकले ‘कांस्य पदक’

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या 11 व्या राष्ट्रीय ओविनाम चॅम्पियनशिप’ स्पर्धेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या हर्षल तानाजी गरड यांनी कांस्य पदक’ जिंकले आहे.ही स्पर्धा 22 ते 25 सप्टेंबर या कालावधीत उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथे केडी सिंग बाबू स्टेडियमच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडली.

PCMC News : मालमत्ता, उद्यानाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रखवालदारांची नेमणूक

या स्पर्धेत महाराष्ट्रातून 15 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेल्या हर्षल गरड यांना लखनऊ येथे उत्तरप्रदेशचे माजी जलविद्युत मंत्री आमदार डॉ. महेंद्र सिंहओविनाम असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रवीण गर्गमहानगर उपाध्यक्ष घनश्याम अग्रवालप्रादेशिक क्रीडा अधिकारी अजय सेठी यांच्या प्रमुख उपस्थित सन्मानीत करण्यात आले.

हर्षल गरड यांच्या यशाबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरेमुख्य कार्यकारी अधिकरी प्रज्ञा पोतदार – पवार व कंपनी सेक्रेटरी निता भरमकर यांनी गरड यांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.