Hathras Rape Case : हाथरसप्रकरणी खोटे मेसेज फॉरवर्ड कराल तर गुन्हे दाखल करू, पुणे पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरून खोटे मेसेज व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

विशेषतः व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असणाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. सामाजिक एकोपा बिघडविण्याच्या हेतूने काही समाजकंटक हाथरस बलात्कार प्रकरणावरून चुकीचे मेसेज व्हायरल करत असल्याचे पोलिसांच्या निर्दशर्नास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा इशारा दिला आहे.

नागरिकांनी पुढाकार घेऊन हाथरस प्रकरणी फेक व चुकीचे मेसेज डिलीट केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही खोट्या अफवांसह इतर चुकीचे मेसेज व्हायरल करु नये. व्हायरल होणा-या अफवांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जपून वापर करण्याचे आवाहनही पुणे पोलिसांनी केले आहे.

ग्रुप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई

व्हॉट्सअ‍ॅप गु्रपद्वारे अनेक माहितीची देवाण-घेवाण होत असते. मात्र, हाथरस बलात्कार प्रकरणी काहीजणांकडून मुद्दामहून चुकीची माहिती ग्रुपवर फॉरवर्ड केली जात असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे. त्यामुळे असे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणा-यांसह संबंधित ग्रुप अ‍ॅडमिनविरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.