Haveli : माझ्यावर कारवाई करणार्‍यांना हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील – विकास दांगट

एमपीसी न्यूज : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Haveli) निवडणुकीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागावर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे. तर, राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे 2 उमेदवार विजयी तर 3 जागांवर स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाला.

त्या विजयानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी स्वतंत्र पॅनल तयार करून सर्व पक्षीय उमेदवारांना त्यांनी संधी दिली. त्यामुळे ही निवडणूक विशेष अर्थाने चर्चेत राहिली. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी करीत असल्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयानंतर गारटकर आणि दांगट या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.

Maval : कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; राष्ट्रवादीला 17 तर भाजपला मिळाली अवघी एक जागा

या सर्व राजकीय घडामोडी दरम्यान आजच्या निवडणुकीत विकास दांगट यांचा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचा दणदणीत विजयी झाला. त्याबाबत विकास दांगट यांना विचारले असता ते म्हणाले, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलवर सर्वांनी विश्वास दाखवत मतदान केले.

त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. त्यामुळे हा विजय तालुक्यातील सर्वांचा आहे. येत्या काळात तालुक्यात विविध माध्यमातून विकास काम निश्चितपणे दिसून येतील. तसेच माझ्यावर कारवाई (Haveli) करणार्‍यांना (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर) हवेली तालुका समजून घेण्यास दहा जन्म घ्यावे लागतील.

अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना विकास दांगट यांनी टोला लगावला. अजित पवार यांची भेट घेणार का त्यावर विकास दांगट म्हणाले की, ते राज्याचे नेते असून जस्ट वेट अ‍ॅण्ड वाच अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.