Haveli News : घरगुती सिलेंडरच्या वायू गळतीने घरामधे आग; महिला जखमी.

एमपीसी न्यूज : मंगळवारी पहाटे (Haveli News) तीन वाजण्याच्या सुमारास न-हे गाव येथील भैरवनाथ मंदिराजवळ, सोनाई निवास येथे चार मजली इमारत असलेल्या ठिकाणी तळमजल्यावरील घरामधे (हॉल-किचन) घरगुती सिलेंडरमधून वायू गळती झाल्याने स्फोट होत आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला वर्दी मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचताच घरामधील वायुगळती असणारा सिलेंडर प्रथमतः बाहेर काढत जवानांनी पाण्याचा मारा करत गृहपयोगी वस्तूंना लागलेली आग इतरत्र पसरु न देता पूर्ण विझवत पुढील धोका टाळला. या घटनेत घराचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी जवानांनी घरातील मोकळे इतर दोन सिलेंडर बाहेर काढले व सुरक्षेच्या कारणास्तव वायुगळती होत असलेला सिलेंडर स्वतच्या ताब्यात घेतला. तसेच अग्निशमन अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार, दलाची मदत पोहोचण्याआधी घरातील महिला हि आगीमुळे जखमी (भाजली) झाल्याने तिच्या पतीने तिला तातडीने खाजगी रुग्णालयात नेल्याचे समजले.

Ranbhaji 2022 : माॅडर्न महाविद्यालयात रानभाजी 2022 महोत्सव संपन्न

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र (Haveli News) अधिकारी प्रभाकर उम्राटकर, तांडेल पांडुरंग तांबे, वाहन चालक संतोष चौरे व फायरमन नितीन मोकाशी, सतीश डाकवे, संजू चव्हाण तसेच मदतनीस कोकरे, जाधव यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.