Dehuroad: पूर्वीच्या भांडणातून टोळक्याची तरुणाला हॉकीस्टीकने मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या भांडणातून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेसबॉल आणि हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली.  ही घटना रावेत येथे शुक्रवारी  दुपारी घडली.

उमेश अजित अगरवाल (वय 32, रा. सेलेस्टीक सिटी, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जनरलसिंग बोपरीया (रा. सेलेस्टीक सिटी, रावेत) याच्यासह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आणि उमेश यांची पूर्वी भांडण झाले होते. उमेश शुक्रवारी पार्कींगमधून घरी जात असताना टोळक्याने या भांडणाच्या कारणावरून उमेशला बेसबॉल आणि हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली. यात त्याचे बोट पंक्चर झाले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.