Pune : ‘एचसीएमटीआर’चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळे रद्द – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज – ‘एचसीएमटीआर’चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळेच रद्द केल्याचे पुणे महापालिका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या निविदा चढ्या दराने आल्याने त्या रद्द करण्याची मागणी दिलीप बराटे यांनी दि. 31 ऑगस्ट 2019 रोजी केली होती. त्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात आले होते. या प्रकल्पाची मूळ निविदा 5 हजार 200 कोटी रुपये होती. मात्र, निविदा दुप्पट किमतीच्या आल्या आहेत. या निविदा प्रकरणात प्रशासनाकडून नियम धाब्यावर बसवले जात आहे, असेही बराटे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी या प्रकल्पावर गंभीर आक्षेप घेतले होते. महापालिकेला 8 हजार कोटी रुपये खर्च परवडणारा नसल्याचे महापालिका आयुक्तांनी म्हटले होते. 30 वर्षांपूर्वीचा हा प्रकल्प असल्याने आताच्या परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा इशारा सुतार यांनी दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.