Chakan News : कपड्यांचे दुकान फोडून कपडे, चप्पल, कॉस्मेटिक साहित्य चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने कपड्यांचे दुकान फोडून दुकानातून कपडे, चप्पल, कॉस्मेटिक साहित्य, मोबाईल एसेसरीज, चामडी बेल्ट, लेडीज जेंट्स पॉकेट पर्स असा एकूण 92 हजारांचा माल चोरून नेला.

अर्चना अंकुश नरळे (वय 27, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 4) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 1 मे रोजी दुपारी चार या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेदनकरवाडी येथे धनश्री कलेक्शन नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शेडचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 70 हजार रुपये किमतीचे लेडीज व जेन्ट्स कपडे, दहा हजार रुपयांच्या लेडीज व जेन्ट्स चपला बूट, दोन हजार रुपये किमतीचे लेडीज कॉस्मेटिक, दहा हजार रुपये किमतीचे मोबाईल एसेसरीज, चामडी बेल्ट, लेडीज जेंट्स पॉकेट, पर्स असा एकूण 92 हजारांचा माल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.