Pune News : पत्नीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला

मोक्कामाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज : शहरातील नानापेठेतील सराईत गुंड सुरज ठोंबरे याच्या टोळीतील आणि मोक्का गुन्हयात फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. तो बायकोला भेटायला आला असतानाच समर्थ पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले.

गोट्या माने उर्फ नरसिंह भिमा असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात दरोडा, फरासखाना पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी आणि समर्थ पोलीस पोलीस ठाण्यात मोक्काच्या गुन्हयात फरार होता.

पोलिसांनी सुरज ठोंबरे टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. मोक्कापासून गोट्या फरार झाला होता.  गोट्या त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी मंगळवार पेठेतील शाळेजवळ येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस नाईक निलेश साबळे, सुमित खुटटे व महेश जाधव यांना मिळाली. त्यानूसार पथकाने सापळा रचून गोट्याला ताब्यात घेतले. त्याला मोक्का न्यायालयात हजर केले असता २२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.