Hinjwadi : कॉफी प्यायला जायचा बहाणा करत पळवून नेऊन विवाहितेशी केले लग्न

एमपीसी न्यूज – कॉफी प्यायला जायचे आहे, असे सांगून विवाहितेला पळवून नेऊन धमकी देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी विवाह केला. ही घटना बावधन येथे 26 डिसेंबर 2019 ते 7 जानेवारी 2020 दरम्यान  घडली.

याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित नंदू भूमकर (वय 28, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉफी प्यायला जायचे आहे, असे सांगून आरोपी याने फिर्यादी महिलेची दिशाभूल करून तिच्या इच्छेविरूद्ध तिला पळवून नेले. बावधन येथे पाच ते सहा दिवस थांबविले. त्यानंतर कोल्हापूर येथे घेऊन गेला. तेथे 3 जानेवारी 2020 रोजी धमकी देऊन फिर्यादी यांच्या इच्छेविरूद्ध त्यांच्याशी विवाह केला. फिर्यादी यांनी त्यांच्या भावाला फोन केल्याच्या कारणावरून आरोपी याने त्यांना मारहाण केली.

त्यानंतर त्यांना कराड येथे घेऊन गेला. तेथे एक दिवस थांबून पुन्हा पुण्यात आला. पुण्यात एका हॉटेलमध्ये असताना फिर्यादी महिला यांनी त्यांच्या भावाला मोबाइलवरून संदेश पाठविला. भाऊ आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. आरोपी याने खोटे सांगून फिर्यादी महिला त्यांच्या पतीकडे असताना त्यांना पळवून नेऊन आरोपी याने त्यांच्याशी विवाह केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.