Pune : वडिलांनी कामावर जाण्यास सांगितले म्हणून वार करत केली वडिलांची हत्या

एमपीसी न्यूज – वडिलांनी केवळ कामावर जा सांगीतले म्हणून 20 वर्षीय मुलाने ढोपलेल्या वडिलांवर वार करत त्यांचा थेट खून केला. हा धक्कादायक प्रकार विश्रांतवाडी (Pune) परिसरात घडली आहे.या घटनेदरम्यान आरोपीने त्याच्या बहिणीलाही जखमी केले.

Pimpri : शहरात मोठ्या उत्साहात बाप्पांचे घरोघरी आगमन

शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय 20) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मण मंजुळे (५५) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकऱणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेरोजगार होता. तो टिंगरे नगर परिसरात आपल्या कुटुंबीया सोबत रहात होता. वडिलांनी त्याला वारंवार कुठेतरी काम करायला सांगितल्याने तो रागावला होता. असून ते अनेकदा मुलाला चांगला माणूस बनण्यासाठी वर्तन बदलण्यास सांगत असत. मात्र, याचा राग मनात धरून आरोपीने आपल्याच वडिलांना जीवे मारण्याचा कट रचला आणि झोपलेल्या अवस्थेचा वापर करून छाती व पोटावर वार केले.

वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या बहिणीवरही कात्रीने हल्ला करण्यात आला असून तिच्या हातालाही जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी शिवनाथला अटक केली असून भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 324 आणि 302 नुसार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.