Pune News : प्रवासी म्हणून बसले अन् मारण्याची भीती दाखवून रिक्षा चोरून नेली

0

एमपीसी न्यूज : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या दोन जणांनी रिक्षाचालकाला दगडाने मारहाण करण्याची भीती दाखवून त्याची रिक्षा चोरून नेली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशाल दिलीप करपते (वय 21, गंगा विला सोसायटीसमोर हांडेवाडी रोड) आणि विकी गोपाल बुरघाटे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रिक्षाचालक कुणाल विनोद अग्रवाल (वय 21) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. मंगळवारी सकाळी त्यांच्या रिक्षामध्ये हडपसर येथील ससाणेनगर येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून दोघेजण बसले होते. त्यानंतर बोरगावातील वाडेकर वस्ती जवळ येताच वरील दोन आरोपीने फिर्यादीला दगडाने मारण्याची धमकी देत जबरदस्तीने रिक्षा  चोरून नेली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून वरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment