Pimpri News : लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या महिलेची पैशांची पिशवी फाडून 85 हजारांची रोकड पळवली

एमपीसी न्यूज – पिंपरी मेन मार्केट येथे लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पैशांची पिशवी फाडून अज्ञात चोरट्यांनी 85 हजारांची रोकड पळवली. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी घडली.

सुनिता अनवा तामचीकर (वय 50, रा. पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तामचीकर सोमवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास पिंपरी मार्केट येथे लग्नाच्या खरेदीसाठी आल्या होत्या. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची पैशांची पिशवी फाडून त्यातून 85 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार दुपारी तीन वाजता उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.