Chinchwad Crime News : गळ्याला चाकू लावून उद्यानात बसलेल्या तरुणाला लुटले 

एमपीसी न्यूज – उद्यानात बसलेल्या इसमाच्या गळ्याला चाकू लावून चार तरुणांनी त्यांना लुटले. संभाजीनगर, चिंचवड येथील साई उद्यानात गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पद्माकर प्रभाकर दांडगे ( वय 32, रा. ताम्हणेवस्ती, चिखली ) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 21 ते 24 वयोगटातील चार तरुणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दांडगे संभाजीनगर, चिंचवड येथील साई उद्यानातील बाकावर बसले होते. त्यावेळी चार अनोळखी तरुणांनी येऊन त्यांना दमदाटी करत तुझ्याजवळचा मोबाईल दे अशी मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिल्यावर एका आरोपीने चाकू त्यांच्या गळ्याला लावला तर दुसऱ्या एकाने त्यांना मागून पकडले. आरोपींनी फिर्यादी यांच्या खिशातील दहा हजार किंमतीचा मोबाईल व रोख रक्कम चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी अधिक तपास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.