Chakan News : कामावरून घरी निघालेल्या पत्नीला रस्त्यात अडवून तिच्यावर कोयत्याने वार

पत्नी गंभीर जखमी, पतीसह तिघांना अटक

0

एमपीसी न्यूज – कामावरून घरी निघालेल्या पत्नीला भर रस्त्यात अडवून पतीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने पत्नीवर कोयत्याने वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 6) रात्री म्हाळुंगे येथे द्वारका सिटीकडे जाणा-या रस्त्यावर घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुनीता कृष्णा दांडेल (वय 27, रा. घाटे वस्ती, ज्योतिबानगर, आंबेठाण, ता. खेड. मूळ रा. परभणी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 7) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कृष्णा राम दांडेल (वय 34), काळू काशीराम माळसे (वय 35), अमलेश्वर गुलचंद मस्के (वय 35, तिघे रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिता दांडेल या इंडोरंस कंपनीत काम करतात. मंगळवारी रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर त्या घरी जात होत्या. म्हाळुंगे कमानीजवळ रिक्षातून उतरून त्या द्वारकासिटीच्या रस्त्याने पायी जात असताना रात्री साडेसात वाजताच्या सुमरास आरोपी पती कृष्णा आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून फिर्यादी यांचा रस्ता अडवला. कृष्णा याने सुनीता यांचे तोंड दाबून त्यांना खाली पाडले. दोन्ही आरोपींनी सुनीता यांचे हात पकडले. त्यानंतर कृष्णा याने कोयत्याने सुनीता यांच्यावर वार केले. यामध्ये सुनिता यांच्या खांद्यावर, मानेवर, डोक्याच्या मागील बाजूला, दंडावर दुखापत झाली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment