Wakad News : सही करून ठेवलेला कोरा चेक चोरून बँकेतून 16 लाख काढले

एमपीसी न्यूज – सही करून ठेवलेला रक्कम न भरलेला कोरा धनादेश एका व्यक्तीने चोरला. त्यावर 16 लाख रुपये रक्कम भरून तेवढे पैसे बँकेतून काढून चोरी केली. ही घटना जानेवारी 2021 ते 18 मार्च 2021 या कालावधीत थेरगाव येथे घडली.

शरद कुंडलिक बारणे (वय 39, रा. थेरगाव) यांनी याबाबत बुधवारी (दि. 31) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय शंकर जाधव (रा. नेरे दत्तवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा एक धनादेश सही करून त्यांच्या गाडीत ठेवला होता. जानेवारी 2021 ते 18 मार्च 2021 या कालावधीत आरोपी दत्तात्रय याने तो धनादेश चोरला. त्यावर 16 लाखांची रक्कम भरून तेवढे पैसे बँकेतून काढून चोरी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.