Yajuvendra Mahajan : समाजाला जास्तीत जास्त योगदान देण्याचा विचार करतो त्याचे जीवन कृतार्थ ठरते – यजुर्वेंद्र महाजन

एमपीसी न्यूज – समाजाला जास्तीत जास्त योगदान देण्याचा विचार करणाऱ्या माणसाचे जीवन कृतार्थ ठरते, असे मत नामवंत व्याख्याते व दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन (Yajuvendra Mahajan) यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थी सहयोग संस्थेने संत तुकारामनगर येथे स्व. संदीप वसंतराव शेवडे स्मृतिदिनानिमित्त महाजन यांचे ‘यथार्थ जीवन, कृतार्थ जीवन’ या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांतप्रमुख प्रा. प्रशांत साठे, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. एन. डी. पाटील, इंद्रायणी को-ऑप बँकेचे संस्थापक अॅड. एस. बी. चांडक, विद्यार्थी सहयोग संस्थेचे अध्यक्ष दीपक पांचाळ, महापालिकेचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, माजी नगरसेवक वसंतराव शेवडे, संदीप शेवडे यांची कन्या वैष्णवी शेवडे आदी उपस्थित होते.

महाजन (Yajuvendra Mahajan) म्हणाले की, स्वतःसाठी जगणारे मृत असतात. इतरांसाठी जगणारे हे खरे जीवन जगतात. स्वामी विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार आपण प्रत्येकजण महान कार्यासाठी जन्माला आलो आहोत. आपले जीवन कृतार्थ ठरविण्यासाठी आपण स्वप्न पाहिले पाहिजे, ध्येय ठरविले पाहिजे आणि ते ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःला झोकून देऊन प्रयत्न केले पाहिजेत. अखिल मानव जातीच्या, समस्त विश्वाच्या कल्याणाचा विचार करतो, तो महान जीवन जगतो.

Dr. Suresh Tharkude : डाॅ. सुरेश थरकुडे यांना पीएचडी पदवी प्रदान

जन्माला प्रत्येकजण येतो आणि त्याला एके दिवशी हे जग सोडून जावे लागते. या दरम्यानच्या काळात जीवन कसे जगायचे ही प्रत्येकीची पसंतीआहे. जीवन अमूल्य आहे. श्वास, चैतन्य, प्रत्येक क्षण, योगदान, कृतज्ञतेची भावना हे महत्त्वाचे आहे. आपण माणूस आहोत, जीवंत आहोत, हा सर्वात मोठा आनंद आहे. माणूस असल्याचे व जीवंत असल्याचे महत्त्व कळलं नाही तर जीवनात तक्रारी सुरू होतात.

माणूस नको त्या गोष्टींची काळजी करत बसतो. मी, माझा जोडीदार व माझी मुलं या पलिकडे गेलात तरच मानवी जीवनाचा खरा आनंद अनुभवता येतो. माणूस विचार करू शकतो. माणूस स्वप्न पाहू शकतो. माणूस मोठमोठ्या समस्या सोडवू शकतो. माणसात सेवाभाव जास्त असतो. त्यामुळे माणसाला समाजाला, मानवजातीला, या संपूर्ण विश्वाला काय योगदान देता येईल, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे, असे महाजन म्हणाले.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान… हीच वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार

हरिभाऊ करमाळकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. प्रा. एन. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा जोशी यांनी आभार मानले. शीतल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. वंदना जोशी, सतीश नागरगोजे, लक्ष्मण खाडे, धनंजय चंद्रात्रे, सचिन बुटाला, नंदू जाधव, कृष्णा भंडलकर तसेच विद्यार्थी सहयोग संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.