Pune Crime News : तडीपार असतानाही कंबरेला पिस्तुल लावून फिरणारा सराईत जेरबंद

दोन पिस्तुल जप्त

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार असतानाही शहरात खुलेआम कमरेला पिस्तुल लावून फिरणाऱ्या सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.

जयेश विजय लोखंडे (वय 20 वर्ष, रा. मंगळवार पेठ) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. फरासखाना पोलिसांनी त्याला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुणे शहर व पुणे जिल्हातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस नाईक सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, शिवाजीनगर येथील मंगला टॉकीज मागे एक इसम शस्त्रासह येणार आहे.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद अवस्थेत उभ्या असणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे दोन पिस्तुल आणि 4 जिवंत काडतुसे सापडली.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन, समर्थ पोलीस स्टेशन आणि चतु:शृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. फरासखाना पोलिसांनी त्याला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुणे शहर व पुणे जिल्हातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, कर्मचारी सचिन जाधव, इम्रान शेख, महेश बामगुडे, योगेश जगताप, सुधीर माने, तुषार माळवदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.