Pune District Crime News : डोक्यात वार करून खून, मृतदेह फेकला ओढ्यात

एमपीसी न्युज : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धारधार हत्याराने एका इसमाचा खून करून मृतदेह ओढ्यात फेकला. दौंड तालुक्यातील कुसेगावच्या हद्दीत हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. उत्तम पवार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम पवार हे दौंड तालुक्यात नव्याने होणाऱ्या अष्टविनायक मार्गावर सिमेंटच्या रस्त्यांना टँकरद्वारे पाणी देत होते. मात्र अचानक त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र  व्यक्तीच्या डोक्यात मोठ्या जखमा आहेत. त्यामूळे हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. यवत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.