YCMH : मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण सोनी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था, मेडीसीन विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. प्रविण सोनी (YCMH)  यांची नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या क्लिनीकल मेडीकल सब्जेक्ट मेडीसीन व अलाईड सब्जेक्टकरिता विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळातील अभ्यास मंडळाचा निकाल 20 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा (YCMH) कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निकाल जाहीर केला. विजयी उमेदवारांचे विद्यापिठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी अभिनंदन केले.

Pune Crime : पुण्यात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून लुटले तब्बल 47 लाख

क्लिनीकल मेडीकल सब्जेक्ट मेडीसीन व अलाईड सब्जेक्टकरिता डॉ. प्रविण सोनी यांच्यासहित एकूण 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. पदव्युत्तर संस्था उभारण्यात (YCMH) डॉ. प्रविण सोनी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल  पदव्युत्तर संस्थेतील डॉक्टरांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.