Pune : मारहाण झाल्यामुळे मानसिक तणावातून मुख्याध्यापकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेचा राग मनात धरून काही इसमांनी मारहाण केल्यामुळे मानसिक तणावातून डोणजे येथील मुख्याध्यापकाने कॅनाॅलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक कावरे (वय 49) असे आत्महत्या करणा-या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी मृत मुख्याध्यापकाच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कावरे हे डोणजे येथील एका माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना काही कारणामुळे शिक्षा केली होती. विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेचा राग मनात धरून अशोक कावरे यांना 24 सप्टेंबरला शाळेत येऊन काही इसमांनी मारहाण केली. या सर्व प्रकारामुळे मुख्याध्यापक कावरे हे मानसिक तणावाखाली आले आणि त्यातून त्यांनी कॅनाॅलमध्ये उडी मारून आत्महत्या केली.

याप्रकरणी दोन पुरूष आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.