Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने पीएमपीएमएलच्या 400 कर्मचा-यासाठी आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस चालक, कंडक्टर, ग्राउंड स्टाफ आणि मेकॅनिक यांच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तणावग्रस्त परिस्थितीत कठोर परिश्रम करतात आणि शहराला वाहतूकसेवा पुरवतात परिणामी  त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने निगडी बस आगारात १० आणि ११ ऑक्टोबरला 400 कर्मचा-यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे.

यावेळी रोटरी क्लब प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, बस डेपो व्यवस्थापक गव्हाणे,पर्यवेक्षक कारेकर आणि पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते.

ईसीजी, साखर, डोळा, रक्तदाब, दंत आणि आरोग्यविषयक कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. ” रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने त्यांना पुढील उपचारांची आवश्यकता असेल त्या उपचारासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तणावग्रस्त परिस्थितीत काम करणा-या कर्मचाऱ्यांसाठी हि आरोग्य तपासणी महत्वपूर्ण आहे” असे रोटरी क्लब प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.