Health Checkup Camp : स्वातंत्र्य दिनानिमित्त खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Health Checkup Camp) एमआयडीसी, मायमर वैद्यकीय कॉलेज तळेगाव आणि नम्रता स्टोन क्रेशर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खाण कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात 325 खाण कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य कॅम्पचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे, शांताबाई काकडे, नम्रता स्टोन क्रेशरचे मालक किरण काकडे व रो.गणेश काकडे व पोलीस निरीक्षक पंडित अहिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Sky Child Foundation : विशेष मुलांनीही साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

या कॅम्पमध्ये एकूण 325 खाण कामगारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर करण्यात आले. BP, Oxygen Level, Pulse Rate व Spyrometer चेकअप रो.डॉक्टर युवराज बढे यांच्या मार्गदर्शनाखाली मायमर मेडिकल कॉलेजचे अनेक डॉक्टर व नर्सेस यांनी केले.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Health Checkup Camp) एमआयडीसीचे अध्यक्ष रो.विन्सेंट सालेर, रो.सचिव मिलिंद शेलार, उपाध्यक्ष रो.राहुल खळदे, रो.सचिन कोळवणकर,रो.दशरथ जांभुळकर, रो. लक्ष्मण मखर, शाळीग्राम भंडारी, दिपक बाळसराफ, रो.आशिष खांडगे, रो.योगेश शिंदे, रो.फ्रान्सिस रोझरियो उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.