Pune : आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्रीराम वसाहत मित्र मंडळ, धायरीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवा दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचा २०० जणांनी लाभ घेतला. तर रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.

हे शिबिर सिल्व्हर बर्च हॉस्पिटल (धायरी) आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सौजन्याने पार पडले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संस्थापक-अध्यक्ष सुनील शेळके यांनी पत्रकाद्वारे दिली. या उपक्रमात मंडळाच्या राजेंद्र मारणे (संस्थापक, सचिव), राजेंद्र ओझरकर (संस्थापक खजिनदार), कैलास पजगाडे (संस्थापक, कार्याध्यक्ष), विक्रम शेळके आणि कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

सार्वजनिक गणेशोस्तवाचे ‘श्रीराम वसाहत मित्र मंडळा’चे यंदाचे १० वे वर्ष होते. या निमित्त मंडळाने मुलांसाठी अनेक खेळांच्या स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा, आनंद मेळा, असे अनेक उपक्रमाचे आयोजन केले होते. सिल्व्हर बर्च हॉस्पिटल (धायरी) आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या टीमच्या वतीने शिबिरादरम्यान रक्तदाब, ई.सी.जी., मधुमेह तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि सल्ला देण्यात आला.

श्रीराम वसाहत मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी धार्मिक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी येणारा इतर खर्च टाळून जमा झालेल्या लोकवर्गणीतून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच पूरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.