Pune Crime news : कचरा वेचकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना पुणे महापालिकेचा आरोग्य निरीक्षक जाळ्यात

एमपीसी न्यूज – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला 5 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. कचरा वेचणाऱ्या एका व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली होती. या कारवाईने पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. स्वप्नील कोठावळे असे लाचखोर आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, स्वप्निल कोठावळे हे पुणे महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणून काम करतात. कचरा गोळा करणाऱ्या एका व्यक्तीला ठराविक ठिकाणीच ड्युटी देण्यासाठी त्यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती.

दरम्यान तक्रार आल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली आणि त्यात स्वप्निल कोठावळे यांनी लाच मागण्याची निष्पन्न झाले. त्यानंतर आज स्वप्निल कोठावळे याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यात पंचासमक्ष कोठावळे यांनी पाच हजार रुपये लाच स्वीकारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.