Health Minister on Corona Vaccination : जुलै 2021 पर्यंत 25 कोटी जनतेचे कोविड लसीकरण करण्याचं लक्ष्य – आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन

एमपीसी न्यूज – जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सरकारकडे 400 ते 500 कोटी डोस उपलब्ध होतील. त्यातील 25 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी वर्तवला आहे. 

संडे संवाद या कार्यक्रमात आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

सरकार कोरोनावरच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी 24 तास काम करत आहे, करोनाची लस आल्यानंतर वितरण प्रणालीचेही काम सुरु आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला करोना लस कशी दिली जाईल ही आमची प्राथमिकता आहे.

करोना लशीच्या संदर्भात उच्चस्तरीय तज्ज्ञांची एक समिती कार्यरत असल्याचे ते म्हणाले. कोरोना वरची प्रभावी लस उपलब्ध झाल्यानंतर त्याचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक राज्यांना वयोमानानुसार प्राथमिक तयारी तयार करण्यासाठी निर्देश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

रशियाच्या स्पुटनिक-V या लशीबाबत अजून निर्णय घेतला नसून देशातील जनतेच्या हिताचा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले. कोणतीही लस असो, त्याबाबत तिची सुरक्षितता आणि कार्यक्षमता भारतात तपासली जाऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.