Hearing of Maratha reservation : मराठा आरक्षणावरील सुनावणी काही काळासाठी तहकूब

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती, मात्र ही सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडणार होती. सकाळी 11 वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. परंतु यावेळी सरकारी वकील मुकुल रोहतगी हे अनुपस्थित होते. परंतु त्यानंतर काही काळासाठी न्यायालयानं ही सुनावणी स्थगित केली. दरम्यान, याप्रकरणी आजच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसंच सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आरक्षणाला स्थगिती देताना प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. याच खंडपीठाकडून आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी यासंबंधी बोलताना ज्या खंडपीठाने स्थगिती दिली त्यांच्यासमोर सुनावणी न होता दुसऱ्या खंडपीठासमोर घेण्यात यावी अशीही विनंती करणार असल्याचं म्हटलं होतं.

“मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला हवी ही फक्त सरकारचीच नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे,” असंही अशोक चव्हाण म्हणाले होते. “मराठा आरक्षणावरुन आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मंजुरी मिळावी हीच आमची भूमिका आहे. तसंच हा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.