Maratha reservation : मराठा आरक्षणावर आज सुनावणी

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीच्या आजचा महत्वाचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीने सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनावणीला सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण जे मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या पाच सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्त्व करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.