Chakan : चाकणमध्ये पोलीस बंदोबस्तात करवाढ हरकतींवर सुनावणीस सुरुवात

एमपीसी न्यूज – चाकण (Chakan) ग्रामपंचायतीतून नगरपरिषद अस्तित्वात आलेली आहे. चाकण ही ‘ब’ वर्ग नगरपरिषद आहे. तत्कालीन ग्रामपंचायतचे कर कमी होते, परंतु नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर नगर परिषदेची कर रचना ही वेगळी आहे. कर 23 टक्क्यांनी वाढलेले आहेत. करवाढीबाबत सुमारे 3200 लोकांनी हरकती घेतल्या होत्या. नागरिकांच्या हरकतीबाबत पोलीस बंदोबस्तात सुनावणी घेण्यात आली.

चाकण नगर परिषदेच्या हद्दीत 26 हजार मालमत्ताधारक आहेत. या बाबतच्या हरकती घेतलेल्या नागरिकांच्या अर्जावर सुनावण्या चाकण येथील मीरा मंगल कार्यालयात मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने करवाढ करण्याच्या संदर्भात जे धोरण अवलंबलेले आहे; त्याबाबत नागरिकांनी यावेळी प्रचंड रोष व्यक्त केला. अनेक नागरिकांना सुनावणीच्या आदल्या दिवशीपर्यंत या बाबतच्या नोटीसा देण्यात येत आल्या. अनेकांना अद्याप या नोटीसा मिळाल्याच नसल्याच्या देखील अनेक तक्रारी आहेत. प्रत्यक्षात सुनावणी पूर्वी आठ दिवस आधीच नागरिकांना नोटीसा मिळणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने नागरिकांमध्ये कमालीचा रोष पाहायला मिळाला.

Manobodh by Priya Shende Part 79 : मनोबोध भाग 79 – मना पावना भावना राघवाची

चाकण नगरपरिषदेचे (Chakan) मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले कि, नागरिकांना नोटीसा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी असल्यास संबंधित सर्वांना पुरेसा वेळ दिला जाणार आहे. नागरिकांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून नगररचना विभागाचे अधिकारी, चाकण पालिकेचे अधिकारी व कर्मचारी असा पुरेसा स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.