Pune : राव, फरेरा, वरनॉन, गडलिंग व सेन यांच्या अर्जावर बुधवारी सुनावणी

एमपीसी न्यूज – माओवादी संघटनांशी संबंध असल्यावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांच्या आणि नजरकैदेत असलेल्या दोघांच्या जामिनावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.

एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप करत तुषार दामगुडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर अॅड. सुरेद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे या पाच जणांना अटक केली. त्यापैकी अॅड. गडलिंग आणि सेन यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. तर वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोन्झालवीस, सुधा भारद्वाज हे नजरकैदेत आहेत. त्यापैकी राव, फरेरा आणि वरनॉन यांनी जामिनासाठी गायकवाड यांना कारागृहात भेटण्यास अर्ज केला आहे.

रक्ताचे नातेवाईक नसल्याने शरद गायकवाड यांना भेटण्यास परवानगी देण्यात यावी, असा अर्ज सुधीर ढवळे यांनी न्यायालयात दाखल केला होता. मात्र, या अर्जाला सरकारी पक्षाच्या वतीने विरोध करण्यात आला. आणि त्यानुसार न्यायालयाने सुधीर ढवळे यांनी केलेला अर्ज फेटाळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.