Lonavala : लोणावळ्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर व परिसरात आज बुधवारी सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

मागील दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ होऊन काहीशी ऊष्मा वाढण्यास सुरुवात झाली होती. आज सायंकाळी अचानक साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या प्रचंड कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. कामगार सुटण्याच्या वेळेस पावसाला सुरुवात झाल्याने कामगार वर्गाचे मोठे हाल झाले. जागा मिळेल त्याठिकाणी दुचाकी उभी करत वाहन चालक उभे होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.